Saturday 15 August 2015

"आकांत फुटावा जिवाचा"

आकांत फुटावा जिवाचा
रडावा तो कोण्या सुरात
कोण सांगावे हे आम्हांस ?
तर तो  हुशार मुर्खाचा बाप...

त्याच्या  दुःखाचाच उगम
अंत हरविला आसमंत
तू नाही रे वाली त्याचा
याची त्या यमासही खंत...

मन रडतोय त्याचा
तू तसाच उभा रे
थोडी लाज बाळग वेड्या
त्याची आस तू हो रे...

कोण्या दगडाचा रे तू ?
काय मनात तुझ्या रे ?
माणूस मातीचाच आहे
हे तू विसरलास की काय रे..?

दोन शब्द तेवढे प्रेमाचे
तू त्याच्याशी ही बोल रे
अद्याप नायक नाही कवितेला
तेव्हा तूच नायक हो रे...

दुःख सर्वांनांच आहे
अपवाद त्याला तूच कसा रे ?
तात्पुरता विसर स्वतःला
त्यास आभारी तू हो रे...

*कमलेश *

Sunday 9 August 2015

"ए आई !"

आयुष्याच्या वेलीवर
डळमळणारी ही नाती
कितीही शिखर जरी गाठले
तरी वाट तुझीच पाहती...

जीवनाच्या या प्रवासात
मी कुठे गं हरवून गेलो?
पण मी तरी काय करू? परतीच्या त्या वाटेत
मी वाटच गमावून बसलो...

कुठेही निघून गेलो तरी
तो चंद्र माझ्या सोबतच राहील
तू थोडी घराबाहेर निघून बघ
त्यात मी दिसतो की नाही...

दूरवर एवढ्या निघूनही
तुला मुळीच विसरलो नाही
तुझ्याच त्या सखोल आठवणीत
माझं मन मलाच खाई...

किती यश माझ्या भागी आले
तुला काय गं सांगू ?
शेवटी तुझ्या आर्शिवादाशिवाय
आणखी दुसरं काय गं  मागु..?

परत मी नक्कीच येईल
केवळ तुझ्याचसाठी
तुझ्याच त्या कुशीत डोकं ठेवून
निश्चिंत झोपण्यासाठी...

ए आई !
पुन्हा एकदा माफ कर मला
हात मोकळे करून
हृदयाशी घट्ट लाव जरा… 
हृदयाशी घट्ट लाव जरा…


*कमलेश*