Saturday, 15 August 2015

"आकांत फुटावा जिवाचा"

आकांत फुटावा जिवाचा
रडावा तो कोण्या सुरात
कोण सांगावे हे आम्हांस ?
तर तो  हुशार मुर्खाचा बाप...

त्याच्या  दुःखाचाच उगम
अंत हरविला आसमंत
तू नाही रे वाली त्याचा
याची त्या यमासही खंत...

मन रडतोय त्याचा
तू तसाच उभा रे
थोडी लाज बाळग वेड्या
त्याची आस तू हो रे...

कोण्या दगडाचा रे तू ?
काय मनात तुझ्या रे ?
माणूस मातीचाच आहे
हे तू विसरलास की काय रे..?

दोन शब्द तेवढे प्रेमाचे
तू त्याच्याशी ही बोल रे
अद्याप नायक नाही कवितेला
तेव्हा तूच नायक हो रे...

दुःख सर्वांनांच आहे
अपवाद त्याला तूच कसा रे ?
तात्पुरता विसर स्वतःला
त्यास आभारी तू हो रे...

*कमलेश *

Sunday, 9 August 2015

"ए आई !"

आयुष्याच्या वेलीवर
डळमळणारी ही नाती
कितीही शिखर जरी गाठले
तरी वाट तुझीच पाहती...

जीवनाच्या या प्रवासात
मी कुठे गं हरवून गेलो?
पण मी तरी काय करू? परतीच्या त्या वाटेत
मी वाटच गमावून बसलो...

कुठेही निघून गेलो तरी
तो चंद्र माझ्या सोबतच राहील
तू थोडी घराबाहेर निघून बघ
त्यात मी दिसतो की नाही...

दूरवर एवढ्या निघूनही
तुला मुळीच विसरलो नाही
तुझ्याच त्या सखोल आठवणीत
माझं मन मलाच खाई...

किती यश माझ्या भागी आले
तुला काय गं सांगू ?
शेवटी तुझ्या आर्शिवादाशिवाय
आणखी दुसरं काय गं  मागु..?

परत मी नक्कीच येईल
केवळ तुझ्याचसाठी
तुझ्याच त्या कुशीत डोकं ठेवून
निश्चिंत झोपण्यासाठी...

ए आई !
पुन्हा एकदा माफ कर मला
हात मोकळे करून
हृदयाशी घट्ट लाव जरा… 
हृदयाशी घट्ट लाव जरा…


*कमलेश*
  


Sunday, 2 August 2015

"तिची ओढ़"

आज बराच वेळ तिचा फोटो पाहत बसलो होतो...

तिचा चेहरा, तिचे डोळे
तिचे ओठं, तिचे गाल
आणि एकंदरित त्यामुळे
झालेला माझा  हाल-बेहाल...

सगळ्या आठवणी भूतकाळातून निघून
 कधी  वर्तमानात आल्या आणि
पुढे भविष्याच्या प्रवासालाही निघाल्या
मला काहीच कळले नाही...

नेमकं काय झालं असावं ?
कुठे हरविलो होतो मी ?
ही प्रश्ने सोडवायला मला आवडली असती
जर मी हरविलेल्या जगात तिची आठवण नसती...

ह्या साऱ्या गोष्टी कश्या एकमेकांशी जुळून असतात
त्यातल्या त्यात त्या आठवणी अलगद दळुन असतात
काही एकमेकांत गुंफुन साखळी बनवितात
तर काही खोडकर प्रवृत्तीच्या गालावर खळी...बनवितात

कधी नजरा-नजर झालीच तर
तर थोड़ी गोची व्हायची
पण तरीही.., सापडलो बाप्पा म्हणत
पुढे आणखी हिंमत यायची

कधी वाटायचं की प्रतिसाद योतोय
तर कधी 'तिची  ओढ़' वाटायची
नुसत्या तेला-मातीच्या ह्या दिव्याला
तिच्या वातीची जोड़ जगवायची...

*कमलेश*
#आठवण_बाप्पा

Thursday, 30 July 2015

"तू न्याय कर..."

 
कुठे आहेस तू ? कशी आहेस तू ?
ही प्रश्ने आजही तुझ्या उत्तराची वाट पाहत तशीच पडून आहेत
कधी येशील तू ? काय बोलशील तू ?
तुझ्या त्या एका हाकेसाठी बिचारी कधीची  थांबून आहेत...

चल माझं असु दे , माझं सोडून दे 
माझा स्वतः चा तर मी ही विचार करत नाही 
मग तुझ्याकडून काय अपेक्षा ठेवू  
पण त्या प्रश्नांची, त्यातील शब्दांची 
त्या शब्दांत दडलेल्या माझ्या भावनेशी 
माझ्या प्रेमाशी तर न्याय कर...

त्यांनी काय गुन्हा केला 
ती सर्वे तर माझा लहान झालेला तोंड पाहुन 
माझ्यावर उपकार करून 
माझा संदेशच तुझ्यापर्यन्त घेऊन आली होती 
तेव्हा त्यांच्याशी तरी न्याय कर...

माझं पुन्हा तेच,
माझं असु दे, माझं सोडून दे 
मी ही इतरांप्रमाणे आज आहो, उद्या नाही 
पण ती प्रश्ने जर निरूत्तर राहिली 
तर ती तशीच त्यांना हव्या असणाऱ्या 
त्यांच्या उत्तराच्या शोधात कायम भटकत राहतील 
तेव्हा त्यांच्याशी तरी न्याय कर...

तुझ्या प्रेमाखातर विचारलेल्या प्रश्नांशी 
तुझ्या प्रेमात पाहिलेल्या त्या स्वप्नांशी
आता तरी तू, न्याय कर...

*कमलेश* 
#आठवण_बाप्पा